Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले

IPL 2024 Sunrisers Hyderabad Full Squad: एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली शेवटच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामात खेळलेल्या सनरायझर्स हैदराबादने याआधी केवळ 18 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते. यंदाच्या आयपीएल 2024 मिनी लिलावामध्ये, सनरायझर्स हैदराबाद संघाने आणखी 6 खेळाडू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च केला आणि 25 खेळाडूंचा संघ पूर्ण केला. असे असूनही, संघाला अखेरीस आपल्या पर्समधील 3 कोटी 20 लाख रुपये वाचविण्यात यश आले. या लिलावात सनरायझर्स हैदराबादने विकत घेतलेला सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स होता, ज्याच्यावर त्यांनी 20 कोटी 50 लाख रुपये खर्च करून त्याला आपल्या संघाचा भाग बनवले. त्यामुळे पुढील मोसमात हैदराबाद संघ मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले.

सनरायझर्स हैदराबादने IPL 2024 खेळाडूंच्या लिलावात पॅट कमिन्सला सर्वात महागडा खेळाडू म्हणून विकत घेतले, ज्यासाठी त्यांनी त्यांच्या पर्समधून 20 कोटी 50 लाख रुपये खर्च केले. यानंतर संघाने ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडला दुसरा महागडा खेळाडू म्हणून घेतले, ज्याच्यासाठी त्यांनी 6 कोटी 80 लाख रुपये खर्च केले. सनरायझर्स हैदराबाद संघाने दोन मोठ्या मॅचविनिंग खेळाडूंच्या समावेशाने संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही निश्चितपणे मजबूत केली आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला 1 कोटी 60 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. तर 1 कोटी 50 लाख रुपये खर्च करून वनिंदू हसरंगाचा संघात समावेश करण्यात आला. सनरायझर्स हैदराबादने पुढील हंगामासाठी जथवेध सुब्रमण्यम आणि आकाश सिंग यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांना खरेदी करून 25 खेळाडूंचा संघ पूर्ण केला.

IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेले खेळाडू:

पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनाडकट, वानिंदू हसरंगा, थावेध सुब्रमण्यम, आकाश सिंग.

सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू कायम ठेवले:

एडेन मार्कराम अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद , अभिषेक शर्मा, मार्को जॉन्सन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन, फझक फारुकी.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत