141 खासदारांचे निलंबन होणं, ही ऐतिहासिक घटना नसून बेशरम पणाचं लक्षण आहे – संजय राऊत

Sanjay Raut – संसदेच्या सुरक्षितता भंग प्रकरणी (Parliament Attack) काल पुन्हा दोन्ही सदनांमध्ये विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं लोकसभेतील 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी सोमवारी दोन्ही सदनांमधील मिळून 78 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

काल संसद सुरक्षितता भंग प्रकरण आणि त्याचबरोबर या 78 खासदारांवर झालेल्या निलंबन प्रकरणावरूनही उर्वरित सदस्यांनी सदनामध्ये गदारोळ सुरूच ठेवला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पंतप्रधानांची विपर्यस्त स्वरूपातील छायाचित्रे असलेली पत्रकं ठिकठिकाणी लावल्यावरून संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान,141 खासदारांचे निलंबन होणं, ही ऐतिहासिक घटना नसून बेशरम पणाचं लक्षण आहे. कालच त्यांचं भाषण मी ऐकलं संसदीय दलाच्या बैठकीतील भाजप आणि त्यांच्या अंधभक्तांनी लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं आहे. आज आम्ही स्मशानात जात आहोत. तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना उन्माद चढला आहे., असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले