लग्नापूर्वीच अभिनेत्री कियारा अडवाणीला बनायचं होतं आई? “म्हणाली, मला प्रेग्नेंट व्हायचे आहे कारण…”

Kiara Advani Pregnancy: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही सध्या तिच्या सत्यप्रेम की कथा या सिनेमामुळे चर्चेत आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अभिनीत सत्यप्रेम की कथा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर सतत कियारा अडवाणी हिला गुड न्यूज कधी देणार? हे विचारले जात आहे. शेवटी यावर नुकताच भाष्य करताना कियारा अडवाणी ही दिसली आहे. कियारा अडवाणी (Kiara Advani Interview) म्हणाली की, मला प्रेग्नेंट होण्याची खूप जास्त इच्छा आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आणि खास आहे.

वास्तविक, व्हायरल होत असलेली कियाराची ही मुलाखत तिच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहे. ज्यामध्ये कियाराने गर्भवती राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा व्हिडिओ कियाराचे सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न होण्याच्या पूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री असे म्हणताना दिसत आहे की, मला गरोदर राहायचे आहे जेणेकरून मला जे पाहिजे ते मी खाऊ शकेल. मला कुठेही फिरता येईल. मला मुलगा होवो की मुलगी याने मला काही फरक पडत नाही… फक्त माझं बाळ निरोगी असावं..’