मनसेच्या नेत्याने सांगितले नेमके संजय राऊतांचे खरे मालक कोण ?

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नुकतीच दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Sharad Pawar Pm Modi Meet) भेट घेतली. खासदार संजय राऊत (Ed Raid on Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, बारा आमदरांच्या नियुक्तीचा मुद्दा आणि लक्षद्वीपच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? असा सवाल करत मोदींकडे पवारांनी या कारवाईची तक्रार केली. दरम्यान, या भेटीनंतर आता अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून मनसेने या मुद्द्यावरून आता जोरदार टीका केली आहे.

मनसेचे नेते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी ट्वीट करून टीका केली आहे. ते म्हणतात, नवाब मलिक आणि अनिल देशमुख या स्वतःच्या माणसांना अडचणीत ठेऊन संजय राऊत यांच्यासाठी पवार साहेब सरळ मोदींच्या छावणीत गेले ही एकच गोष्ट पुरेशी आहे संजय राऊतांचे खरे “मालक “कोण हे सांगायला… शिवसैनिक किती सहज “;येडा”; बनलाय ना.? असा टोला चिले यांनी लगावला आहे.