६.५ लाखात BMW कुठे मिळते हे पण आता उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना सांगावं – निलेश राणे

Mumbai – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.

सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती जमा होणं, मातोश्री 2 सारखी इमारत, गाड्या, फार्महाऊसेस निव्वळ अशक्य आहे. आमचाही हाच व्यवसाय आहे. मग संपत्तीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवाल याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केले आहे. मराठी तरुणांनो आदर्श घेण्यासारखी गोष्ट नाही तरीसुद्धा काही न करता करोडो रुपयांची मालमत्ता कशी जमा करावी यासाठी आपण उद्धव ठाकरेंकडे अर्ज करावा. शेअर्समध्ये उद्धव ठाकरे इतके तरबेज आहेत की ते उद्धव झुनझुनवाला होऊ शकतात. ६.५ लाखात BMW कुठे मिळते हे पण सगळ्यांना सांगावं.असा सणसणीत टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.