प्रियांका वाड्रा याच असणार काँग्रेसचा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपला ‘युवा जाहीरनामा’ प्रसिद्ध केला. याला ‘रिक्रूटमेंट लेजिस्लेशन’ असे नाव देण्यात आले आहे. यावेळी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा आणि  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते.

यादरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा  यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होण्याचे संकेत दिले.मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी प्रियंका गांधी यांना विचारला. त्यावेळी  मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून दुसरा कोणता चेहरा दिसतोय का असं उलटसवाल प्रियंका गांधी यांनी विचारला. त्यामुळे प्रियंका गांधीच उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात.

दरम्यान, प्रियंका यांनी पक्षाचे वरिष्ठ सहकारी आणि भाऊ राहुल गांधी यांच्यासमवेत नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात २० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत जाहीरनामा लॉन्च केला. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यात तरुणांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न दुर्लक्षित काँग्रेस करत आहे.