ऑलंपिक पदक विजेत्या मीराबाईने स्वीकारला एएसपी पदाचा कार्यभार

टोकियो ऑलंपिक 2020 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने रजत पदक मिळविले होते. मिराबाईने पदक मिळवल्यानंतर तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. मीराबाईने जेव्हा पदक जिंकले तेव्हा मणिपूर सरकारने तिला अतिरिक्त पोलिस अधीक्षक हे पद दिले जाईल असे जाहीर केले होते. त्या प्रमाणे मिराबाईला ते पद दिले गेले. तिने आज या पदाचा कार्यभार संभाळला. त्यानंतर मीराबाईने ट्विटरवर मणिपूर पोलिसांचे आभार मानले आहे.

तसेच मला या गोष्टीचा फार गर्व आहे की मी मणीपुर पोलिस सेवेत रुजू झाले आहे. मला यामुळे देशवासीयांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे असे मीराबाईने म्हटले आहे. मीराबाई ही 27 वर्षीय असून तिला यंदा भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे.

मिराबाईला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. मीराबाई मणीपुर राज्यातील एका छोट्याशा गावातील मुलगी आहे. लहानपणी तिरंदाजीमध्ये पदक मिळवायचे होते पण जेव्हा ती आठवीमध्ये गेली तेव्हा तिने तीच्या पुस्तकात वेटलिफ्टर कुंजराणी देवी यांची स्टोरी वाचली. त्या नंतर मीराबाईने ठरविले आता आपण देखील वेटलिफ्टरच बनायचे.