बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक, शरद पवार-उद्धव ठाकरे उपस्थित राहणार? 

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडी तयार करण्याच्या प्रक्रियेत सामील असलेल्या विरोधी पक्षांची पुढील बैठक – 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.  या बैठकीत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) पोहोचणार आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) पोहोचू शकतात.

या बैठकीत तक्रारीही दूर केल्या जाणार असून, जागावाटपावरही चर्चा होणार आहे. यासोबतच पुढील कृती योजनाही ठरविण्यात येणार आहेत. दरम्यान, याआधी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली आहे. या सभेत सहभागी होण्यासाठी जवळपास 15 पक्षांचे नेते पाटण्याला पोहोचले होते.

यादरम्यान राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी विरोधी ऐक्याबाबत सहमती दर्शवली. मात्र आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. किंबहुना, केंद्राच्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आम आदमी पक्ष सातत्याने मागणी करत आहे. काँग्रेसने हे केले नाही तर ते आतापासून विरोधी पक्षाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे ‘आप’कडून सांगण्यात आले.