लता मंगेशकरांची शेवटची इच्छा राज्य सरकार पुर्ण करणार? शरद पवारांनी १० मिनिटांत दीदींचं ‘ते’ स्वप्न पूर्ण केलंय

मुंबई : भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ९३ वर्षी ब्रींच कँडी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंतिम अंत्यसंस्कार करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावे संगीत महाविद्यालय असावं, अशी त्यांची शेवटची इच्छा होती. त्यासंदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठी घोषणा केली आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे जगभरात शोककळा पसरली आहे. लती दीदींची शेवटची इच्छा राज्य सरकार पुर्ण करणार आहे. दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय असावं अस लतादीदींच स्वप्न होत, त्यांचं हे स्वप्न लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या सहकार्याने आणि आदित्यजींच्या पुढाकाराने सत्यात उतरेल. विद्यापीठाने जागा नाकारल्यामुळे कलिना येथीलच विभागाची जागा द्यायचा निर्णय घेतला आहे, असं उदय सामंत यांनी सांगितले आहे.

दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची घोषणा मागेच करण्यात आली होती. मात्र जागेची अडचण असल्याने कामकाज पुढे गेलं नाही. याआधीही लता मंगेशकर यांनी पुण्यात वडिलांच्या नावे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढच्या दहा मिनिटांत त्यांनी जागेचा प्रश्न सोडवला होता.

लतादीदींनी पुण्यात वडिलांच्या नावे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा १० व्या मिनिटाला शरद पवारांनी लतादीदींना रूग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून दिली होती. शरद पवार यांना शास्त्रीय संगीताची खूप आवड आहे. त्यामुळे ते नेहमी लता मंगेशकर यांच्या संपर्कात राहत होते. लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देखील शरद पवार हे शिवाजी पार्कवर उपस्थित राहिले.