Animal सिनेमात रणबीरसोबत इंटिमेट सीन करणारी ती अभिनेत्री कोण आहे? बनलीय तरुणांची नॅशनल क्रश

Animal Movie Intimate Scene Actress: संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ऍनिमल’ (Animal) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंधाना स्टारर ऍनिमल या चित्रपटातील ॲक्शन सीन्ससोबतच त्यातील इंटिमेट सीन्सचीही तितकीच चर्चा होत आहे. यातील काही सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे.

चित्रपटातील एका सीनमध्ये रणबीर कपूर साकारत असलेला रणविजय हा त्याच्या पत्नीची (रश्मिका मंदाना) फसवणूक करतो. झोया नावाच्या एका महिलेसाठी तो पत्नीला धोका देतो. झोया आणि रणविजय यांच्या इंटिमेट सीक्वेन्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरी ही झोयाच्या भूमिकेत आहे.

तृप्तीने साकारलेल्या झोयाच्या भूमिकेविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आणि रणबीरच्या इंटिमेट सीनचीच जोरदार चर्चा होऊ लागली आहे. एका सीनमध्ये दोघंही न्यूड असून, तोच सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तृप्तीचा जन्म 1994 मध्ये उत्तराखंडमध्ये झाला. 2017 मध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ या चित्रपटातून ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. या चित्रपटात तिची फार छोटी भूमिका होती. ‘मॉम’नंतर तृप्तीने ‘पोस्टर बॉईज’मध्ये भूमिका साकारली. पण 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लैला मजनू’मुळे तिला खरी ओळख मिळाली. यानंतर तृप्तीने नेटफ्लिक्सच्या ‘बुलबुल’ आणि ‘कला’ या दोन चित्रपटांमध्ये दमदार काम केलं. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. ‘बुलबुल’मधील भूमिकेसाठी तृप्तीला पहिला फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला. ‘कला’मधील ‘घोडे पे क्यू सवार है’ हे तिचं गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा