महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यावे तरच त्यांचे जीवन समृद्ध बनेल – अमृता फडणवीस

Amruta Fadnavis: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने नमो चषक अंतर्गत नमो वॉकेथॉनचे आयोजन केले होते त्याप्रसंगी सौ. फडणवीस यांनी असे प्रतिपादन केले की महिला शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर मी पहिल्यांदाच बघत आहे आपण महिला सर्वच आघाड्यांवर लढत असतो आपणच स्वतःची काळजी घेतली तरच आपले जीवन समृद्ध सशक्त बनेल भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे मी विशेष कौतुक करते की असा उपक्रम राबवून त्यांनी महिलांच्या मागे भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी आहे हे दाखवून दिले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाल्या उद्या श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त देशात सगळीकडे भगवे वातावरण निर्माण झालेले आहे ही येणाऱ्या हिंदू राष्ट्राची नांदीच आहे.

शिवाजी मानकर

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामुळेच श्रीराम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे अचूक वेळी घेतलेले योग्य निर्णय यामुळे हे शक्य झाले आहे . शहरांमध्ये तसेच देशांमध्ये सर्व वातावरण राममय झालेले आहे ५२८ वर्षाच्या संघर्षानंतर हा विजय उत्सव संपूर्ण देश साजरा करत आहे. नमो वॉकेथॉन माध्यमातून महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण आदी विषयामध्ये महिला आघाडीचे काम खरंच कौतुकास्पद आहे प्रत्येक आठवड्यात महिलांसाठी अशा विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना प्रेरणा व स्फूर्ती देण्याचे काम आपण केले पाहिजे.

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की नमो चषकाच्या अंतर्गत पुणे शहरात अत्यंत उत्साहात प्रतिसाद मिळत आहे आजचे नमो व्याकेथॉन हे त्याचेच प्रतीक आहे या नमो वॉकेथॉन चेसंयोजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, संयोजिका प्रियांका शेंडगे शिंदे ,गायत्री खडके, भावना शेळके, आरती कोंढरे, खुशी लाटे, सरचिटणीस कोमल कुटे, उज्वला गौड यांनी केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अमृता फडणवीस, आमदार माधुरीताई मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा