राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत ३ जानेवारीला कार्यकर्ता शिबिर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याकरिता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याकरिता शिर्डी येथे ३ जानेवारी रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. महाविकास आघाडी राज्यात आगामी निवडणुका एकत्रित लढणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कशाप्रकारे एकत्रित येऊन काम करावे या संदर्भात देखील या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रित कशाप्रकारे काम करावे या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, एसटी बँकेमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारच्या वतीने उत्तर देताना व्यवस्थापक निवडताना आरबीआयच्या निकष पूर्ण करण्यात आले नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता सहकार आयुकांनी व्यवस्थापक संचालक यांना बडतर्फ केलं आहे. याबद्दल आम्ही सहकार आयुक्तांनी हा निर्णय घेतल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहे. असेही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री पद हे या दोन्ही पक्षाच्या समतीने देण्यात आल आहे. त्यामुळे त्यांना सहन करण्याची शक्ती आता ठेवावी लागेल. पण यावरून हे स्पष्ट होते की महायुती मधील हा विसंवाद आहे. पुण्यातील शिंदे शिवसेना गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आता सहन केल्याशिवाय काही पर्याय नाही. असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची खरं तर तक्रार होती. पण त्यांची तक्रार न ऐकता आत्ता त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना कुठे ना कुठे तरी अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे परंतु आमची लढाई सत्याची आहे त्यामुळे आमचा विजय होईल असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटपा संदर्भात कुठल्याही पक्षाने किती जागा लढवणार यासंदर्भात चर्चा झालेली नाही आहे. येत्या दोन आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये आणखी काही पक्ष सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.. असेही जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस परत आणायचे आहेत’

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत