चिखली तालुक्यातील माजी सभापती, सरपंचांसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये

चिखली ( जि. बुलडाणा ) तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव अंभोरे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार श्वेता महाले-पाटील, खा. सुनिल मेंढे आदी उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, चिखली मतदारसंघात भाजपाला बळकटी देण्यासाठी झटणाऱ्या आ. श्वेता महाले यांनी विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. भाजपाचा पाया चिखली मतदारसंघात अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाकडून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. आगामी काळात भाजपाला सर्वच निवडणुकांमध्ये चिखली मतदारसंघात आ. श्वेता यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मोठे यश मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी बोलून दाखवला.

चिखली पंचायत समितीचे माजी सदस्य राजू पाटील, एकलारा चे सरपंच गजानन अंभोरे, उपसरपंच ज्ञानेराव अंभोरे, माजी सरपंच पाटीलबा पवार, सातगांव भुसारी चे सरपंच बाबुराव देशमुख ,पळसखेड चे माजी सरपंच प्रकाश लोखंडे, योगेश भुसारी, सदाशिव डुकरे यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश तायडे, खरेदी विक्री संघाचे संचालक भारत सुरुशे, नितीन पाटील आदी स्थानिक भाजपा कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत ३ जानेवारीला कार्यकर्ता शिबिर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

निधीतील घसरणीवर मात करण्यासाठी काँग्रेसने स्वीकारला क्राऊड फंडिंगचा मार्ग, जाणून घ्या कसा मिळतोय प्रतिसाद

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस परत आणायचे आहेत’