World Cup 2023: पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येणार नाही, जाणून घ्या हरभजनने का केला हा दावा

World Cup 2023: क्रिकेट चाहत्यांच्या नजरा वर्ल्ड कपवर खिळल्या आहेत. भारतीय भूमीवर ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाच्या विश्वचषकाच्या संभाव्यतेवर मोठे विधान केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला की, लोक म्हणत आहेत की विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास पाकिस्तान संघासाठी खूप सोपा होणार आहे. पण माझा विश्वास आहे की पाकिस्तान संघ एकदिवसीय फॉर्मेटमध्ये फक्त सरासरी संघ आहे. तो पुढे म्हणाला की, पाकिस्तान संघ टी-२० फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट क्रिकेट खेळतो, पण एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तो संघ एवढा काही खास नाही आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने विश्वचषकासाठी टॉप-4 संघांची निवड केली, जे उपांत्य फेरीतील स्थानाचे प्रबळ दावेदार आहेत. माजी भारतीय ऑफस्पिनरच्या मते, भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरी गाठणारे टॉप-4 संघ असतील. उल्लेखनीय आहे की नुकतेच आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमधील गटातील सामना पावसामुळे वाहून गेला. पण सुपर-4 फेरीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या-

Virat Kohali : देशभक्त विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गायकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, जाणून घ्या नेमके कारण …

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास