Farah Khan: गणपती पूजेदरम्यान फराह खानने घातली चप्पल? नेटकऱ्यांनी घेतला समाचार

Farah Khan : सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळतेय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. अगदी शाहरुख खान आणि सलमान खान यांनीदेखील त्यांच्या घरी बाप्पांचे स्वागत केले असून चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.  प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननेही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या फोटोतील एका गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली.

फराह खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांच्या घरातील एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री हुमा कुरेशी आणि पत्रलेखा दिसत आहेत. या फोटोमध्ये फराहने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड सूट परिधान केला असून त्यावर त्याच रंगाचे स्लीपर्स घातले आहेत. याचमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

फराहच्या या फोटोवर विविध कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘पूजेच्या वेळी चप्पल कोण घालतं’, असा सवाल एकाने केला. तर ‘कृपया स्लीपर काढून वावर. गणेश पूजेदरम्यान पायात चप्पल घालू नये’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

नेटकऱ्यांकडून सतत होणाऱ्या टीकांनंतर अखेर फराहने त्यावर स्पष्टीकरण दिलं. ‘आम्ही घराबाहेर होतो पण सांगण्यासाठी धन्यवाद. तुमची नजर थेट चप्पलवर गेली. तुमचं डोकंच फार दूषित आणि नकारात्मक आहे’, असं तिने म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-