महिलांनी काही नाही घातलं तरीही त्या छान दिसतात..! रामदेव बाबांची घसरली जीभ

ठाणे| काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यामुळे त्यांच्यावर भरपूर टीका झाली होती. याच साखळीत आता योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांचेही नाव जोडले गेले आहे. रामदेव बाबा यांनी स्त्रियांनी अंगावर काहीही नाही घातले, तरीही त्या छान दिसतील, असे वादग्रस्त विधान केले आहे. ठाण्यातील एका योगा कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

“महिला साडीमध्ये खूप छान दिसतात, त्या सलवारमध्येही छान दिसतात. पण माझ्या मते तर, महिलांनी काही नाही घातलं तरी त्या छान दिसतात”, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड टीका होत आहे.

असे का म्हणाले रामदेव बाबा?
ठाणे येथे एका योगा संमेलनात रामदेव बाबा यांची जीभ घसरली. या कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते. त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांचा योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला व लगेचच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही.

यावरून रामदेव बाबा म्हणाले की, “साड्या नेसायला नाही मिळाल्या काही समस्या नाही… आता घरी जाऊन साड्या नेसा. महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्येसुद्धा चांगल्या अमृता फडणवीस यांच्या सारख्या चांगल्या वाटतात.. आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असं वक्तव्य राम देव बाबा यांनी केलं.