Raj Rajpurkar- ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून जालन्याच्या अंबड येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या एल्गार सभेमध्ये ज्या पद्धतीने लोकांची जमवाजमव करण्यात आली. ज्या पद्धतीने ही एल्गार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची सभा म्हणून संबोधित करण्यात आलं होतं. परंतु ही ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा नसून भुजबळ बचाव एल्गार सभा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे.
या सभेच्या दरम्यान व्यासपीठावर फक्त विजय वडेट्टवार काँग्रेस विधानसभा विरोधी पक्ष नेते सोडले तर सर्वच नेते भारतीय जनता पक्षाच्या निगडित असल्याचं देखील ते म्हणाले.
राज राजापूरकर म्हणाले की, एल्गार सभेच्या माध्यमातून ओबीसी बचाव अशी भूमिका घेत असताना आजचे मंत्री भुजबळ साहेब आज कुठेतरी दुटप्पी भूमिका घेताना दिसत आहेत. कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये प्रवर्ग करून आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतली असा आरोप करत असलेले मंत्री हे राज्यात मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, तेच जर असा आरोप करतात या वेळेला सरकारच्या भूमिकेबद्दल आणि मंत्रिमंडळाच्या भूमिकेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. काल ओबीसी प्रवर्गातील लोकं मोठ्या प्रमाणात या सभेला गेली होती. अशा लोकांना प्रश्न निर्माण झाला आहे की कालपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना विरोध करणारे आज सत्तेमध्ये फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. भुजबळ आज फडणवीसांच्या विरोधात एक चुकार शब्द देखील काढत नाही आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर हा मंत्री महोदय भुजबळ यांच्याच कॅबिनेट मधून निघालेला आहे. ओबीसी समाजाने जाणून घ्यायला हवा की, ओबीसी ही कोणी वापरण्याची गोष्ट नाही. ओबीसी म्हणजेच एक व्यक्ती नाही. ओबीसी प्रवर्गाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने होत असला तर ओबीसी समाजाच्या लोकांनी हे समजून घ्यायला हवं. ओबीसी समाजाच्या बाबतीत आतापर्यंत जी भूमिका घेण्यात आली होती तीच भूमिका पुढे राहील आणि ती म्हणजे जातीनिहाय जनगणनेची. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी… याबाबतीत आमचं म्हणणं स्पष्ट असल्याचे राज राजापूरकर म्हणाले.
राज राजापूरकर पुढे म्हणाले की, छगन भुजबळ ज्यावेळी तुरुंगवासातून बाहेर आले. त्यावेळी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका कधीच घेतली नाही ते शांत स्वभावानेच निर्णय घेत असत. त्यावेळी छगन भुजबळ आरोग्याची कारणे देत असत. ओबीसींचा लढा न्यायालयीन पध्दतीने लडण्याचे ते म्हणत, पण आता रस्त्यावर उतरुन दोन हात करण्याची, दहशत निर्माण करण्याची भाषा ते बोलत आहेत. आता असं काय घडलं..?ज्यावेळी खरंच आवाज उठवून ओबीसींसाठी उभा राहणं गरजेचं होतं त्यावेळी छगन भुजबळ शांत राहिले. म्हणजेच छगन भुजबळ यांना आता सत्तेत असल्यामुळे क्लीनचीट मिळाली आहे का ? निरमा पावडरने सर्व आरोप धुतले गेलेत का? असा सवाल राज राजापूरकर यांनी विचारला आहे.
राज राजापूरकर यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, छगन भुजबळ यांना त्यांच्या सर्व आरोपातून क्लीनचीट मिळाली असेल त्यामुळे त्यांना आता ओबीसींचा पुळका आला असल्याचं राज राजापूरकर म्हणाले. छगन भुजबळ यांचा राष्ट्रीय ओबीसी नेते बनण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं यावेळी ते म्हणाले. परंतु ओबीसी समाज सुजाण आहे. त्यांना कळतं की कोण कोणाचा वापर करत आहे. येणाऱ्या काळात ओबीसींचा जर कोणी पालन हार असेल तर ते फक्त आदरणीय शरद पवार साहेब आहेत. कारण ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा जन्मच मुळात आदरणीय शरद पवार साहेब यांच्यामुळेच झाला आहे.
राज राजापूरकर म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळ एक भूमिका घेतात आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात घेतलेला मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा जीआर दिल्लीतून आला नसून हा जीआर राज्याच्या मंत्रिमंडळामध्येच निघालेला आहे. तर तिथे विरोध न करता राज्याचे जबाबदार मंत्री समाजात ओबीसी प्रवर्गात येऊन समाजाला एकत्र करून. आग भडकवत आहेत. याचा अर्थ काय आहे. एकीकडे तुमच्याच कॅबिनेट मध्ये बसून जीआर काढले जातात आणि दुसरीकडे तुमचेच मंत्री एका समाजामध्ये आग भडकवत आहेत, याचा अर्थ दोन समाजामध्ये आपल्याला दंगली घडवायच्या आहेत का ? असा सवाल राज राजापूरकर यांनी सरकारला विचारला आहे.
राज राजापूरकर पुढे म्हणाले की, माझी छगन भुजबळ यांना इतकी विनंती आहे की, जर तुम्हाला खरंच ओबीसी समाजाचा इतका पुळका असेल तर तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळाची तातडीने बैठक घेऊन जो निर्णय घेण्यात आला आहे. तो जीआर रद्द करून दाखवा. ओबीसी समाजाला दाखवून द्या की तुम्ही ओबीसी समाजाचे नेते आहात.
राज राजापूरकर म्हणाले की, दुसरा माझा सवाल असा आहे की, २०१९ पासून आपण विधानसभेच्या सभागृहामध्ये सातत्याने फडणवीसांकडे किंवा त्यावेळी सरकारकडे एम्पिरिकल डेटाची मागणी केली. ओबीसींच्या आरक्षण टिकवण्याची भूमिका घेतली होती. तुम्ही त्यावेळी सातत्याने फडणवीस यांच्या वरती आरोप केले आहेत. जातीनिहाय जनगणना ही राज्याच्या हातात आहे. तर का करत नाही असा सवाल राज राजापूरकर यांनी छगन भुजबळ यांना विचारला आहे. तसेच आपण एक जबाबदार मंत्री म्हणून सत्तेत आहात. तर तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी का? करत नाही असा सवाल देखील राज राजापूरकर यांनी छगन भुजबळ यांना विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-