तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही…..अन आर.आर. आबांची आठवण झालीच..

या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून आपला शब्द खरा करणाऱ्या रोहित पाटलांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत रोहित पाटलांनी भल्या- भल्यांना चितपट केले आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती.

रोहित पाटील एकटे पडले आहेत अशा अनेक चर्चा राज्यभर रंगल्या, पण रोहित पाटील यांनी कोणालाच दाद दिली नाही. त्यांनी सभा घेतल्या, जोरदार प्रचार केला आणि विजय मिळविला देखील. आर.आर. पाटील यांचे धाकटे भाऊ सुरेश पाटील जिल्हा बँकेचे संचालक असल्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते नाराज होते. यातून रोहित पाटील यांच्या विरोधात बाद करायचं ठरलं होतं.

रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे चिन्ह होते पण कार्यकर्ते नव्हते.ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली आणि रोहित पाटील यांनी बाजी मारली.कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस ने झेंडा फडकावला.आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर पाहिल्यांच रोहित पाटील यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली होती.