मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं अखेर निलंबन

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली केल्यानंतर आजच आदेश निघण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यानुसार परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे.

परमबीर सिंग यांनी नागरी सेवेच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्या विरोधामध्ये चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींकरिता राज्याच्या गृह विभागाने त्यांच्या विरोधामध्ये विभागीय चौकशी लावण्यात आली होती. या अगोदर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, असे सांगितले होते.

“बेशिस्त वर्तन आणि अनियमितता याकरिता परमबीर सिंग यांच्याविरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईची प्रक्रिया देखील सुरु आहे,” असे त्यांनी सांगितले होते. राज्य सरकार आपले काम करत आहे, असे सांगत गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले की, परमबीर सिंग मुंबईमध्ये परतल्यावर त्यांनी त्याविषयी सरकारला कळवले नाही. तसेच त्यांनी होमगार्डच्या महासंचालक पदाचा पदभार देखील स्वीकारलेला नाही.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी मुंबईच आर्थिक राजधानी राहणार – नवाब मलिक

Next Post

यूपीएशिवाय काँग्रेस म्हणजे शरीराशिवाय आत्मा  – सिब्बल

Related Posts

आर्यनच्या ड्रग्स प्रकरणानंतर शाहरुख खानची सोशल मिडियावर पहिलीच पोस्ट, चाहते म्हणाले..

बॉलीवुडचा किंग शाहरुख खान मागील अनेक दिवसांपासून सोशल मिडियापासून दूर होता. त्यांचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला…
Read More
Amravati Assembly | विजयात निर्णायक भूमिका असलेल्या मुस्लिमांना काँग्रेसने अमरावतीची उमेदवारी द्यावी; भाजपाचे आव्हान

Amravati Assembly | विजयात निर्णायक भूमिका असलेल्या मुस्लिमांना काँग्रेसने अमरावतीची उमेदवारी द्यावी; भाजपाचे आव्हान

Amravati Assembly | भारतीय जनता पार्टी एकाही मुस्लिमाला उमेदवारी देत नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात…
Read More
Pune News | हेल्पिंग हॅण्ड कोथरूडने अंध शाळेत साजरा केला स्वातंत्र्यदिन, ११० विद्यार्थिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Pune News | हेल्पिंग हॅण्ड कोथरूडने अंध शाळेत साजरा केला स्वातंत्र्यदिन, ११० विद्यार्थिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Pune News | हेल्पिंग हॅण्ड कोथरूडच्या वतीने पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मध्ये दृष्टीहीन विद्यार्थिनींनी ‘स्वातंत्र्यदिन आणि…
Read More