आर्यनच्या ड्रग्स प्रकरणानंतर शाहरुख खानची सोशल मिडियावर पहिलीच पोस्ट, चाहते म्हणाले..

बॉलीवुडचा किंग शाहरुख खान मागील अनेक दिवसांपासून सोशल मिडियापासून दूर होता. त्यांचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला आणि शाहरुखवर टीकेची झोड उडाली. मात्र आता प्रकरण पूर्णपणे शांत झाले आहे. त्यामुळे शाहरुख आता पुन्हा सोशल मिडियावर अँकटीव्ह झाला आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर झाली आहे.

या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. शाहरुखने जो विडियो शेअर केला आहे, त्यामध्ये त्याने त्यांच्याकडे असलेल्या एका ब्रॅंडची जाहिरात केली आहे. कुणी किंग इज बॅक म्हटलं आहे तर काहीनी आय लव यू शाहरुख असे म्हटले आहे.

2 ऑक्टोबरला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका क्रुजवर रेव्ह पार्टी करताना सापडला. तब्बल 45 दिवस तो तुरुंगात होता. एनसीबीने त्यांची बरीच कसून चौकशी केली. अखेर 45 दिवसांनंतर त्याला जामिन मिळाला.