शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटाला पाठिंबा देणार; खासदार तडस यांचे भाकीत

Shirdi – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

यातच आता वर्ध्यातील भाजपचे खासदार रामदास तडस ( Ramdas Tadas ) यांनी शिवसेनेचे 12 खासदार लवकरच एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. शिवसेना खासदारांत फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिवसेनेचे 12 खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्तातील गटाला लवकरच पाठिंबा देणार आहेत, असे भाकीत त्यांनी वर्तविले.

जनतेच्या विकासाच्या दृष्टीने जनतेने त्यांना निवडून दिलेले असताना त्याच्या मतदार संघात विकासच झाला नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी, देशाचे संरक्षण करण्यासाठी, हिंदुत्त्व टिकविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील गटाला शिवसेना खासदार पाठिंबा देणार, असे त्यांनी सांगितले.