‘शरद पवार यांनी आपल्या हयातीमध्ये कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही’

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार ( Hindutva ) केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे ( Social Justice Minister and NCP leader Dhananjay Munde ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.ते म्हणाले, प्रत्येक धर्मामध्ये आपापल्या परंपरा आणि प्रथा आहेत त्यामुळे त्याचा बाजार मांडण हे प्रगत महाराष्ट्राला परवडणारं नाही. भोंग्याचं भाडं बदललं की राज ठाकरे शरद पवार यांच्यावर टीका करतात.

शरद पवार यांनी आपल्या हयातीमध्ये कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही. समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन न्याय देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे. पवारसाहेब जर जातीवादी असतील अस त्यांना वाटत असेल तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर माझ्यासोबत चर्चा करावी मग कळेल कोण जातीवादी आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी हिंदुत्वावर चर्चा ( Discussion on Hindutva ) करण्याचं आव्हान राज ठाकरे यांना दिलं आहे