राज्यातील २२०० मुली मार्चमध्ये बेपत्ता; रुपाली चाकणकरांची माहिती

Rupali Chakankar : महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

ज्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यामध्ये फक्त अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. १८ वर्षांवरील मुली आणि महिलांचाही या यादीत समावेश आहे. प्रेम प्रकरण, लग्नाचं आमीष, नोकरीचं आमीष या सगळ्याला बळी पडून बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे असा दावा चाकणकर यांनी केलाय.

विशेष म्हणजे पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं स्पष्ट आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून २२५८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१ तर सांगलीतून ८२ मुली बेपत्ता झाल्या आहेत.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.