यूपी, आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ 10 वर्षांत मुस्लिम लोकसंख्या 32 टक्क्यांनी वाढली, 116 गावांमध्ये  50% झाली 

लखनौ – उत्तर प्रदेश आणि आसाममधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भागात मुस्लिम लोकसंख्या (Muslim population) दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी गृहमंत्रालयाला पाठवलेला अहवाल धक्कादायक आहे. हा अहवाल उत्तर प्रदेश आणि आसाममधील आंतरराष्ट्रीय सीमेच्या आजूबाजूच्या भागांच्या झपाट्याने बदलणाऱ्या लोकसंख्येबद्दल आहे. यूपी पोलिसांच्या अहवालात नेपाळ सीमेवर पिलीभीत , लखीमपूर खेरी, महाराजगंज, बलरामपूर आणि बहराइचसह (Pilibhit, Lakhimpur Kheri, Maharajganj, Balrampur and Bahraich) 7 जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालात उत्तर प्रदेशच्या नेपाळ सीमेला लागून असलेल्या 7 जिल्ह्यांतील मुस्लिम लोकसंख्या 10 वर्षात 32 टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे.

या अहवालानुसार या जिल्ह्यांमध्ये मशिदी आणि मदरशांचा महापूर आला आहे. ही गोष्ट धोकादायक आहे कारण यूपीमध्ये फक्त 7 जिल्ह्यांबद्दल बोलले गेले आहे. त्यांच्या एक हजाराहून अधिक गावांच्या ग्राउंड रिपोर्टची आकडेवारी या संवेदनशील अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे. यूपीच्या या सात जिल्ह्यांतील 116 गावांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 50 टक्क्यांहून अधिक वाढल्याचे सांगण्यात आले आहे. सीमेवर 303 गावे आहेत ज्यात मुस्लिमांची लोकसंख्या 30% पेक्षा जास्त वाढली आहे. या भागातील मशिदींची संख्या 25% पर्यंत वाढली आहे.

यूपीप्रमाणेच बांगलादेशला लागून असलेल्या आसाममधील धुबरी, करीमगंज, दक्षिण सलमारा आणि कचार जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. केवळ यूपी आणि आसाममध्येच नाही तर राजस्थान आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेल्या भागातही मशिदी आणि मदरशांची संख्या झपाट्याने वाढल्याचे समोर आले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय षड्यंत्राकडे लक्ष वेधले असून सरकारला इशारा देण्यात आला आहे. सीमेला लागून असलेल्या भागात अवैध घुसखोर तळ ठोकून असल्याचा संशय उत्तर प्रदेश आणि आसामच्या पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दोन्ही राज्यांच्या पोलिस अहवालात म्हटले आहे की, सीमेवरील जिल्ह्यांमध्ये 2011 पासून मुस्लिम लोकसंख्या 32% वाढली आहे, तर संपूर्ण देशात 10 ते 15% च्या दरम्यान बदल झाला आहे. सीमावर्ती जिल्ह्यांतील मुस्लिमांची लोकसंख्या अचानक वाढणे अनेकांना सामान्य वाटू शकते, परंतु हा मुद्दा गंभीर आहे कारण त्यात पाकिस्तान आणि चीनच्या कारस्थानाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.