गणेश नाईक यांना मोठा दिलासा, महिलेने बलात्काराची तक्रार मागे घेतली

नवी मुंबई : नवी मुंबईतील पावरफुल नेते गणेश नाईक यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या विरोधातील महिलेने दिलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. आमदार मंदा म्हात्रे आणि जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या सांगण्यावरून आपण गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराबाबत व जीवे मारण्याबाबत तक्रार दाखल केली होती असा खुलासा नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेने केला आहे .

विशेष म्हणजे त्यासाठी शिवसेनेकडून उमेदवारी आणि पैशांची ऑफर दिली असल्याचेही पत्रात लिहिले आहे. मात्र, आता माझी गणेश नाईक यांच्याबाबत कुठलीही तक्रार नाही. मी दिलेली तक्रार मागे घेत आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

गणेश नाईक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याबाबत पिडीत महिलेने आज नेरूळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यात सत्य कथन करणारा अर्ज सादर केला परंतु, दीपा चव्हाण यांचा अर्ज आपण स्वीकारला नसल्याची माहिती नेरूळ पोलिसांनी दिली. तर दुसरीकडे आमदार मंदा म्हात्रे याबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.