स्नेहल जगतापांना पक्षात प्रवेश दिल्याने उद्धव ठाकरेंवर कॉंग्रेस नाराज;  ठाकरेंची होणार गोची ?

Mumbai – ठाकरे गटातून दिवसेंदिवस गळती सुरु असताना नुकताच ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला. महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.  यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण असताना आता कॉंग्रेस व्रीरूढ ठाकरे गट असा संघर्ष सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला परंतु ठाकरे गटाने जगताप यांना पक्षात प्रवेश दिल्याने महाविकास आघाडीतला ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष मात्र उद्धव ठाकरेंवर नाराज आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याबाबत म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की हे करू नका. पण तरी त्यांनी केलं. स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला. अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाईल. महाडची जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही ती जागा लढणार आहोत असं ठामपणे पटोले यांनी सांगितले आहे.