खुशखबर: नाशिकमध्ये ए-320 विमानांची देखभाल-दुरुस्ती; देशातील अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प

नाशिक जिल्ह्यातील ओझर इथल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल मध्ये आता ए 320 प्रकारच्या प्रवासी विमान एअरबसची देखभाल दुरूस्ती करण्यात येणार आहे. देशातील हा अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प नाशिकमध्ये असणार आहे.

एचएएलच्या मिग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि एअरबसचे दक्षिण आशियाई विभागाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रेमी मलर्ड यांच्या उपस्थितीत हा करार दिल्लीत करण्यात आला. लढाऊ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे कौशल्य असलेल्या एचएएल प्रकल्पात आता ए 320 प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे.

या करारानुसार ओझर इथल्या एचएएलच्या प्रकल्पात खासगी प्रवासी विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून या संदर्भात परवानगी घेऊन नोव्हेंबर 2024 म्हणजेच वर्षभरात पहिले प्रवासी विमान या ठिकाणी दाखल होऊ शकेल. विशेष म्हणजे युरोपीयन युनियनच्या मान्यताप्राप्त विमान वाहतूक सुरक्षा संस्थेकडून मान्यता मिळाल्यास संपूर्ण आशिया क्षेत्रातील एअरबस विमानांची दुरुस्ती नाशिकच्या ओझर इथल्या प्रकल्पात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर