‘या’ व्यवसायात गुंतवणूक केल्याने अल्पावधीत करोडपती व्हाल; अगदी सोप्या मार्गाने कमवा बक्कळ पैसा

पुणे : भारत हा कृषीप्रधान देश (India is an agricultural country) आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर (Agriculture) अवलंबून आहे. पण असे एक उत्पादन आहे ज्याची भारतात लागवड होत नव्हती मात्र या उत्पादनाची स्वयंपाकघरात नेहमीच उपस्थिती असते. आपण हिंग (Asafoetida) बद्दल बोलत आहोत. भारतात हिंगाची लागवड होत नव्हती, पण हिमाचल प्रदेशात त्याची लागवड सुरू झाली आहे. आजच्या आर्थिक युगात तुम्हालाही चांगली कमाई करायची असेल, तर तुम्ही हिंगाच्या लागवडीतून लाखो रुपये सहज कमवू शकता.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी हिंग संदर्भात मोठे वक्तव्य केले होते, भारताला यापुढे हिंगासाठी जगातील देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे ते म्हणाले होते. अफगाणिस्तान, इराण (Afghanistan, Iran) आणि मध्य आशियातील काही देशांमध्ये हिंगाची लागवड केली जाते. पण दक्षिण इराणमध्ये त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. दक्षिण इराणमधील लार शहराजवळ हिंगाचे उत्पादन सर्वाधिक आहे.

इराणमध्ये हिंगाला देवाचे अन्न म्हणतात. जगातील काही देशांमध्ये याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. भारत हा एकमेव देश आहे जिथे आजही मसाला म्हणून वापर केला जातो. जगातील 40 टक्के हिंग भारतात वापरला जातो. दरम्यान, भारतात आता हिंगाची लागवड सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2020 मध्ये याची सुरुवात झाली आहे. हिमाचलच्या लाहौल खोऱ्यात शेतकऱ्यांनी हिंगाची लागवड सुरू केली आहे. यासाठी त्यांना हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीची (IHBT) मदत मिळाली आहे.

हिंग लागवडीसाठी हेक्टरी 3 लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाच्या पाचव्या वर्षी लागवड केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त फायदा मिळेल. बाजारात एक किलो हिंगाची किंमत सुमारे 35 ते 40 हजार रुपये आहे. त्यामुळे जर तुम्ही एका महिन्यात 5 किलो हिंग विकले तर तुम्ही दरमहा 2,00,000 रुपये सहज कमवू शकता. यापेक्षा जास्त कमाई करण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांशी टाय-अपही करता येईल. याशिवाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उत्पादनाची यादी करून विक्री करता येते. यामध्ये तुम्ही दरमहा ३ लाख रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता.