८८ वर्षीय आजोबांनी जिंकली ५ कोटींची लॉटरी, ४० वर्षांपासून आजमावत होते नशीब

चंदीगढ| असे म्हणतात की, ऊपर वाला जब देता है, तो छप्पर फाड़ कर देता है… असाच काहीसा प्रकार पंजाबच्या डेराबस्सी येथील रहिवासी असलेल्या 88 वर्षीय महंत द्वारका दास यांच्यासोबत घडला, ज्यांनी ५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. पंजाब राज्य लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी 2023 चा निकाल 16 जानेवारी रोजी घोषित करण्यात आला. यामध्ये द्वारका दासने 5 कोटी रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले. विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 30 टक्के कर वजा करून ही रक्कम महंत कुटुंबाला दिली जाईल.

लॉटरी विजेते महंत द्वारका दास म्हणाले, “मी खूप आनंदी आहे. मी गेल्या 35-40 वर्षांपासून लॉटरी खरेदी करत आहे. मी जिंकलेली रक्कम माझ्या दोन मुलांमध्ये आणि माझ्या ‘डेरा’मध्ये विभागून देईन.” दुसरीकडे द्वारका दास यांचा मुलगा नरेंद्र कुमार शर्मा याने सांगितले की, माझ्या वडिलांनी माझ्या पुतण्याला लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. तो जिंकला आणि आम्ही खूप आनंदी आहोत.

सहाय्यक लॉटरी संचालक करम सिंह यांनी सांगितले की पंजाब राज्य लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी 2023 चे निकाल 16 जानेवारी रोजी घोषित करण्यात आले. त्याने (द्वारका दास) 5 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले. विहित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 30 टक्के कर कापून रक्कम दिली जाईल.

पंजाब राज्य केलोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरीचे निकाल सोमवारी (16 जानेवारी 2023) घोषित करण्यात आले. तिकीट क्रमांक 454606 ला 5 कोटी रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले आहे. पंजाब प्रिय लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरीत द्वितीय पारितोषिक विजेते क्रमांक आहेत 317331, 252342, 472960, 469036, 357055. द्वितीय पारितोषिकासह लॉटरी विजेत्यांना 10 लाख रुपये मिळतील.