2 कोटींच्या कारमध्ये फिरतो शुभमन गिल… वयाच्या 23 व्या वर्षी संपत्ती ऐकून व्हाल थक्क

भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यातील वनडे (ODI) मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) शानदार विजयाची नोंद केली. टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) विजयाचा हिरो ठरला. या खेळाडूने वयाच्या २३ व्या वर्षी (shubman gill age) द्विशतक झळकावून (shubman gill century) अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) अँड कंपनीने हा सामना 12 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पण तुम्हाला माहिती आहे का की शुभमन गिल करोडोंचा मालक आहे.

बातम्यांनुसार, गिल 31 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. बीसीसीआयच्या (BCCI) करारात सी श्रेणीतील खेळाडूंना वर्षभरात एक कोटी रुपये किंमत दिली जाते. याशिवाय आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) या खेळाडूला 8 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले होते. आयपीएल व्यतिरिक्त या खेळाडूला युवा आदर्श म्हणून खूप पाठिंबा मिळतो. गिल अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधूनही कमाई करतोय.

वाहनांबद्दल बोलायचे झाले तर सध्या त्याचे कारचे कलेक्शन फार मोठे नाही. या प्रतिभावान फलंदाजाला महिंद्राने (Mahindra) एक थार (Thar) भेट दिली आहे. तसेच त्याच्याकडे नवीन रेंज रोव्हर आहे. या आलिशान एसयूव्हीची किंमत 2.39 कोटी रुपयांपासून सुरू होते. दरम्यान, शुभमन गिलने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध अप्रतिम फलंदाजी दाखवली होती. त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याचवेळी श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.