नितीश कुमार होणार INDIAचे संयोजक? 5 पक्षांचा मिळाला पाठींबा?

Nitish Kumar: INDIA आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत नितीशकुमार (Nitish Kumar) विरोधी आघाडीचे संयोजक बनू शकतील का? पाटण्यापासून (Patna) दिल्लीपर्यंत (Delhi) राजकीय वर्तुळात हा प्रश्न चर्चेत आहे. 11 सदस्यांच्या समन्वय समितीबाबत या बैठकीत निर्णय होणार असल्याने हा प्रश्नही आहे.

जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाआघाडीत सहभागी 5 नेत्यांनी संयोजकपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे, मात्र आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या विरोधामुळे या बाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या आघाडीच्या समन्वय समितीमध्ये एक समन्वयक, एक अध्यक्ष आणि 9 सदस्यांचा समावेश असेल ज्यामुळे मित्रपक्षांमध्ये एकोपा निर्माण होईल. या आघाडीत प्रवक्त्यांची एक समितीही स्थापन करण्यात येणार असून, ही समिती प्रत्येक मुद्द्यावर आघाडीची एक बाजू मांडणार आहे.

अडचणीत असलेल्या नाशिक सहकारी बँकेला वाचवायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे – छगन भुजबळ

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांना संयोजक बनवण्यास सहमती दर्शवली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघडपणे नितीश कुमार यांना स्वतःहून सर्वोत्तम दावेदार म्हटले आहे.सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी हेही नितीश कुमारांच्या बाजूने आहेत. सीपीआयचे डी राजा यांनीही नितीश यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

या आघाडीत समाविष्ट शिवसेना, तृणमूल, सपा, आरएलडी, जेएमएम, डीएमके आणि एमडीएमके यांसारखे मोठे पक्ष अजूनही कोंडीत आहेत. राज्य पातळीवर समिती स्थापन करून जागावाटपाचा वाद मिटवावा, अशी यातील बहुतांश पक्षांची मागणी आहे. या आघाडीत आता एकूण 28 पक्षांचा समावेश आहे. BSP, INLD, AIUDF यासह आणखी 5 पक्षांचा समावेश करण्याची कसरत सुरू आहे.