Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan Live: आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2023) असल्याने पुण्यात (Pune) सकाळी लवकरच गणपतीच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या (Kasba Ganpati) मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. बाप्पा पालखीत विराजमान झाले आहेत. तसेच तांबडी जोगेश्वरी (Tambadi Jogeshwari) यांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.ढोल ताशाच्या गजरात गणरायची मिरवणूक काढण्यात येत आहे.

दरम्यान, अनेक मंडळांनी काल गणेशाचे विसर्जन केले. मात्र एका बाजूला हे सर्व सुरु असताना हिंजवडी येथील एका 23 (Pune Crime News) वर्षीय तरुणाचा मृत्यू चर्चेचा विषय बनला आहे.  योगेश अभिमन्यू साखरे असे मृताचे नाव असून तो हिंजवडी येथील रहिवासी आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरला हृदयविकाराचा त्रास होता आणि डॉक्टरांनी त्याला उपचाराचा सल्ला दिला होता, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तो हिंजवडीजवळ मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये धाव घेतली तिथेच तो कोसळला. ही परिस्थीती पाहू स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना औंध रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता.

योगेश साखरेचा औंध रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साखरे हा विसर्जन मिरवणुकीपासून किमान 25-30 मीटर अंतरावर होते त्यामुळे उच्च डेसिबल आवाज आणि त्यांचा अकाली मृत्यू यांचा काहीही संबंध नसल्याचंदेखील पोलिसांनी सांगितलं आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेली माहिती अशी की, तरुण योगेश साखरे याला जवळपास सहा महिन्यांपासून बीपीचा त्रास होत होता. त्यानंतर तो हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांकडे निदान करण्यासाठी गेला होता.

त्यावेळी त्याला डॉक्टरांनी सांगितले होते की, तुला हृदयाचा त्रास आहे, त्यामुळे तू कोकणे चौक येथील सिनर्जी हॉस्पिटल येथील डॉ. गौतम जुगल यांना दाखवून घे आणि स्वतःवर उपचार कर. त्यामुळे योगेश बुधवारी हिंजवडी येथील चौकात आला. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले म्हणून तो गोळ्या घेण्यासाठी मेडिकलमध्ये आला होता.

योगेश हा कुठल्याही डीजे समोर नाचत नव्हता असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे. तो ज्या मेडिकलसमोर उभा होता, त्या ठिकाणी किंवा जवळपास कोणताही डीजेही वाजत नव्हता. त्याने जवळ असलेल्या मित्रांना सांगितले की, मला चक्कर येत आहे. इतक्यातच तो खाली जमिनीवर कोसळला. त्यानंतर मित्रांनी त्याला जवळ असलेल्या रणजित हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला रुबी हॉस्पिटल हिंजवडी येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याला तिथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश