Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

Ganesh Visarjan Live: आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2023) असल्याने पुण्यात (Pune) सकाळी लवकरच गणपतीच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या (Kasba Ganpati) मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. बाप्पा पालखीत विराजमान झाले आहेत. तसेच तांबडी जोगेश्वरी (Tambadi Jogeshwari) यांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.ढोल ताशाच्या गजरात गणरायची मिरवणूक काढण्यात येत आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत गुरुवारी (ता. २८) सकाळपासून शुक्रवारी मिरवणूक संपेपर्यंत शहरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. वाहतुकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी मुंबई, पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात आहेत. गणेश विसर्जनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश