Pune: ‘माझा मुलगा वारलाय, डीजे लावू नका’ म्हणणाऱ्या कुटुंबाला २१ जणांकडून जबर मारहाण

Pune Crime: काल (28 सप्टेंबर) महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) करण्यात आले. मात्र पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. डीजेच्या आवाजात लाडक्या गणपतीची मिरवणूक सुरू असताना एक परिवार मुलाच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेले होते. अशात घरासमोरुन मिरवणूक जात असताना कुटुंबियांनी डीजे लावू नका अशी मागणी केल्याचा राग धरुन 21 तरुणांनी मिळून त्यांना मारहाण केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे.

तळेगाव येथे ही घटना घडली असल्याची समजत आहे. 25 सप्टेंबर रोजी सोमाटणे फाटा या ठिकाणी सुनील प्रभाकर शिंदे यांच्या घरासमोरून गणपती मिरवणूक जात होती. तिथे डीजे लावला जात असल्याचे बघून शिंदे यांनी माझ्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. आम्ही दुःखात आहोत, इथे डीजे लावू नका अशी विनंती केली. त्यावेळी मिरणवणुकीतल्या कार्यकर्त्यांनी डीजे बंद केला आणि मिरवणूक पुढे नेली. मात्र डीजे बंद करायला लावल्याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात होता.

गणपती विसर्जन करुन आल्यानंतर 21 जणांच्या टोळक्याने शिंदे यांच्या कुटुंबावर हल्ला केला. सुनील शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लोकांना या आरोपींनी काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिंदे जबर जखमी झाले. त्यांनी तळेगाव पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत 21 आरोपींना अटक केली आहे.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा