बोंबला! विवाहित मौलाना मदरशातील विद्यार्थिनीसोबत पळून गेला; पहिल्या पत्नीने पोलीस ठाणे गाठले

Maulana Run Away With Girl: उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मशिदीत मौलाना विद्यार्थिनीसोबत फरार झाला आहे. विशेष म्हणजे मौलाना स्वतः विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मौलानाच्या पत्नीने पतीला परत आणण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आरोपी हा आसपूर देवसरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजिदपूर येथील मदरशात मुलांना शिकवायचा. पिडीत पत्नीने सांगितले की, ती राहत असलेल्या घराचे भाडे देण्यासाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. आता दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेणे तिच्यासाठी कठीण जात आहे.

दुसऱ्या बाजूला याच महिन्यात म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी त्या अल्पवयीन मुलीच्या आईने आसपूर देवसरा परिसरात राहणाऱ्या तिची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली. अल्पवयीन मुलीच्या आईचा आरोप आहे की, तिची मुलगी मौलाना ज्या मदरशात शिकवायचा त्याच मदरशात शिकली, तिला मौलानाने फूस लावून तिच्याशी गुपचूप लग्न केले आणि तिच्यासोबत पळून गेला.

दरम्यान, या अतिरिक्त पोलिस अधीक्षक विद्यासागर मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी झारखंडमधील गढवा येथील रहिवासी मदरसा माजी मौलाना जुनैद आलम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले असून, पोलिस लवकरच आरोपी आणि विद्यार्थ्याचा शोध घेतील.

https://youtu.be/sStgV_m3FeE?si=NZVfXPWs-7mX7C6S

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश