आमदार शिंदे गटातील एकही कार्यकर्ता तालुका पातळीवरील निवडणुकीत विजयी होऊ शकणार नाही – तळेकर

Karmala Politics : आमदार शिंदे (MLA Sanjay Shinde) गटात कार्यकर्त्यांनी केवळ मामांची पालखी वाहण्याचे काम करावे असा सणसणीत टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर (Sunil Talekar) यांनी लगावला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध निवडणुकीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. करमाळा तालुक्यातील तीन गट एकत्र आल्यानंतर सहजिकच आमदार शिंदे गटाकडून सोशल मीडिया वर पाटील गटास लक्ष करण्यात आले होते. यावर आज तळेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी तळेकर यांनी सांगितले की आमदार शिंदे गट हा करमाळा तालुक्यात दहा वर्षे झाली सक्रिय राजकारणात आहे. या दहा वर्षात केवळ स्वतः आमदार संजय मामा शिंदे यांचा अपवाद वगळता त्यांच्या गटातील एकही कार्यकर्ता तालुका पातळीवरील निवडणुकीत विजय मिळवू शकला नाही हे वास्तव आहे. खरे तर आमदार शिंदे गटात असलेले पहिल्या फळीतील कार्यकर्ते हे आपल्याला आदिनाथ, मकाई या कारखान्यात पदे मिळतील तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून येऊ या आशेवर दहा वर्षापासून काम करत आहेत.पण त्यांच्या नशिबी केवळ आमदार मामासाठी मते मागण्याचे काम उरत आहे.

दुसरीकडे माजी आमदार नारायण पाटील यांनी आपल्या एकूण बत्तीस (३२)कार्यकर्त्यांना तालुका पातळीवरील निवडणुकीत निवडूण आणले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य (५), पंचायत समिती सदस्य (9), बाजार समिती (५), आदिनाथ कारखाना (६), पंचायत समिती सभापती (३), पंचायत समिती उपसभापती (३) व एक जिल्हा परिषद अध्यक्ष अशी जनतेतून मतदान मिळालेल्या तीस कार्यकर्त्यांना तालुका पातळीवरील संस्था मध्ये काम करण्याची संधी दिली.जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहेत.दहा वर्षाच्या काळात आमदार संजय शिंदे यांनी केवळ आपल्या स्वताच्या पोळीवर डाळ ओढून घेण्याचे काम केले आहे.

आगामी काळातही आमदार शिंदे गटातील एकही कार्यकर्ता तालुका पातळीवरील निवडणुकीत विजयी होऊ शकणार नाही. यामुळे पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी केवळ मामांच्या पालखीचा भुई होऊन पालखी वाहण्याचे काम करावे असा मार्मिक टोला तळेकर यांनी लगावला. आमदार शिंदे हे चौकशीच्या भीतीपोटी त्रस्त असून त्यांना वरिष्ठ पातळीवर कोणा एका पक्षाची बाजू घेताना कठीण जात आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आमदार शिंदे यांनी कोणाच्या दबावाखाली येऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले हे जाहीर करावे असे आवाहन तळेकर यांनी केले.

https://youtu.be/sStgV_m3FeE?si=NZVfXPWs-7mX7C6S

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश