रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला, नेपाळच्या फलंदाजाने 12 षटकारांसह T20 मधील सर्वात जलद शतक ठोकले

Kushal malla Fastest T20 Century: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Cricket Tournamnets) नेपाळ क्रिकेट संघाने विक्रमी पाऊस पाडला आहे. बुधवारी मंगोलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना या संघाने २० षटकांत तीन गडी गमावून ३१४ धावा केल्या. टी-20 मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. याच सामन्यात नेपाळचा फलंदाज कुशल मल्ला (Kushal Malla) याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma World Record) विश्वविक्रमही मोडला. कुशल मल्लाने T20 मध्ये सर्वात जलद शतक ठोकले आहे. त्याने मंगोलियाविरुद्ध 34 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रोहितने 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 34 चेंडूत शतक पूर्ण केले होते.

कुशल मल्लने 50 चेंडूत 12 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 137 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 274 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. याआधी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम रोहित आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर यांच्या नावावर होता. मिलरने 29 ऑक्टोबर 2017 मध्ये बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत शतक केले होते.

कुशल मल्लाचे हे टी-२० मधील पहिले शतक आहे. याआधी, त्याने 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते, परंतु एकाही सामन्यात त्याला शतक करता आले नाही. त्याच्या नावावर केवळ एकच अर्धशतक होते. कुशल मल्ला एकीकडे वेगवान धावा करत असताना दुसरीकडे दीपेंद्र सिंगही फॉर्मात आला. दीपेंद्रने येताच वादळ निर्माण केले. त्याने आपले अर्धशतक नऊ चेंडूत पूर्ण केले, जे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वात जलद अर्धशतक देखील आहे. दीपेंद्रने 10 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या आणि आपल्या डावात आठ षटकार ठोकले.

https://youtu.be/sStgV_m3FeE?si=NZVfXPWs-7mX7C6S

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश