संभोग करताना 61 वर्षीय प्रियकराचा मृत्यू, पोलीसही झाले हैराण

मुंबई – शारिरीक संबंध (Sex) ठेवताना 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. मुंबईतील कुर्ल्यात (Kurla) ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या खुणा आढळलेल्या नाहीत. मात्र, सध्या या प्रकरणाची अपघाती मृत्यू (Accidental death) अशी नोंद करत तपास सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेक पोलीस आहेत. दरम्यान, पोलिसांनी सोबत असणाऱ्या तरुणीची चौकशी सुरु केली आहे.

कुर्ला पोलिसांनी (Kurla Police) दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील एलबीएस रोडवर (LBS Road) असलेल्या जीएसके हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये आपल्या प्रेयसीशी लैंगिक संबंध (Sex) ठेवताना अचानक तरूणाला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर प्रेयसीने रुग्णालयात नेले तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.तरुणी वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असून खासगी कंपनीत काम करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका 40 वर्षीय महिलेसोबत हॉटेलमध्ये चेक- इन केले. काही वेळाने महिलेने हॉटेलच्या रिसेप्शनला संपर्क साधून तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. त्याननंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी लगेच स्थानिक पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.  (61-year-old boyfriend dies while having sex) .