Manoj Jarange- Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहे. त्यांच्या याच उपोषणास्थळी आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहे. दरम्यान, याच उपोषणास्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी देखील भेट दिली असून ते अंतरवाली गावात दाखल झाले आहे. यावेळी संभाजी भिडे हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही, असा मूर्ख माणूस म्हणजे मी. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहेत. मागे वळून तुम्ही बघायचंच नाही की आपल्या पाठिशी कोण आहे, असं संभाजी भिडे यावेळी म्हणाले.मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करताय ते योग्य आहे. ही लढाई आहे. झट की पट एक घाव दोन तुकडे अशी नाही. पण तुमच्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे. पण तुम्ही हे उपोषण थांबवावं. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही आमचे प्रमुख आहात. मराठा समाज हिंदुस्थानच्या पाठिचा कणा आहे. तु्म्ही उपोषण थांबवा, लढा नाही. मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण जाऊ सांगुयात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं संभाजी भिडे मनोज जरांगेंना म्हणाले.
मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांच्याच नेतृत्वाखाली चालावे हे माझे वैयक्तिक मत आहे. ते करत असलेले प्रयत्न उत्तम असून, माघारी येऊ नयेत. तसेच युद्धातील डावपेच म्हणून उपोषण थांबवलं पाहिजे तसेच तो कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे भिडे म्हणाले.
https://youtube.com/shorts/H091HG5c0C4?si=HDNQWlujXiZkFaxz
महत्त्वाच्या बातम्या-
मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट
नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा
विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज