महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु, राऊतांची अटक हे कटकारस्थान : ठाकरे

मुंबई – शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी संजय राऊत यांना अटक करण्यात आली. संजय राऊतांच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. दुसरीकडे ईडीकडून आज संजय राऊत यांना न्यायालयात हजर केलं जाईल.

गोरेगावातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांना अटक केल्यानं शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे. मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींवर आमदार आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले अआहे. ते म्हणाले, हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असं आदित्य ठाकरे यांनी चिपी विमानतळावर बोलताना म्हटलं आहे.