Nanded Government Hospital Incident : नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला असल्याचं काल समोर आलं. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे.
शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही… अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही! असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
https://www.youtube.com/shorts/m1O2hNRtM40
महत्वाच्या बातम्या-
World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!
नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन
Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar