अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार; अनेक खासदार संपर्कात असल्याचा दावा 

 मुंबई –  बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत.(Abhijeet Bichukale is going to contest for the post of President)  त्यांनी तशी घोषणा केली आहे. त्यासाठी ते ठरवून दिलेल्या 50 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ते राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी खासदारांचा पाठिंबा मिळवत आहेत.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील खासदारही संपर्कात असल्याचं बिचुकले यांनी माध्यमांना सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ राजकारण करणाऱ्यांनी त्यांचे वंशज असणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना राजकीय पक्षांनी पाठिंबा का दिला नाही? , असा प्रश्न त्यांनी विचारला.