महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात ज्या दोन खासदारांनी मतदान केले ते दोघे कोण?

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा विधेयक) बुधवारी (२० सप्टेंबर) संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. त्याच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. दरम्यान, निषेधार्थ मतदान करणारे दोन नेते कोण आहेत, हे समोर आले आहे.

नारी शक्ती वंदन कायदा विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि एआयएमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा समावेश आहे. खरं तर, हैदराबादचे खासदार ओवेसी विधेयकात इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि मुस्लिम समाजातील महिलांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.

एआयएमआयएमचे नेते ओवेसी यांनी सभागृहात सांगितले की, सरकारला केवळ सवर्ण महिलांचे संसदेत प्रतिनिधित्व वाढवायचे आहे. ओबीसी आणि मुस्लिम समाजातील महिलांची चिंता नाही. ओबीसी आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची तरतूद का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. ओवेसी म्हणाले की, संसदेत ओबीसी आणि मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत, पण आज सभागृहात ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व केवळ 20 टक्के आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Virat Kohali : देशभक्त विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गायकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, जाणून घ्या नेमके कारण …

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास