फडणवीस म्हणालेले, जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग, चक्की पिसिंग! मग पहाटे का केलं किसिंग?- अभिजित बिचुकले

पुणे- बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ते सातत्याने राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. 2019 ला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (AJit Pawar) यांनी पहाटे शपथ घेतली होती. हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा चर्चेत येतो. आता अभिजीत बिचुकले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आधी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग करणार! मग पहाटे का केलं किसिंग?, असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. ते पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.