Sharad Pawar | निलेश लंके यांना उमेदवारी मिळाल्याने विखेंचा आत्मविश्वास कमी झालाय, पवारसाहेबांचा हल्लाबोल

Sharad Pawar |  विखे यांना आता आत्मविश्वास राहिलेला नाही. निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या जाहीर सभेत बोलताना विखे यांच्यावर केला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, निलेश लंकेंची चिंता त्यांना वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, असा निरोप उद्योजक घेऊन आला होता. हा निरोप महसूलमंत्र्यांना उद्योजकामार्फत पाठविला होता असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, निलेश लंके आणि राणी लंके यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. मी त्यांच्यासाठी फुलं आणली पण निलेश लंके यांनी ती फुलं दुसऱ्यालाच देऊन टाकली. निलेश लंके यांचा स्वभाव असाच आहे. ते स्वत:साठी काही ठेवायचे नाही दुसऱ्याला देऊ टाकायचे या वृत्तीचे आहेत. मी राणी लंके यांचे आभार मानतो की त्यांनी असा नवरा सांभाळला जो अखंडपणे जनतेत राहतो. असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार, यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. सभेवेळी व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी झाल्यामुळे बसण्यासाठी खुर्च्या अपुऱ्या पडल्या. तेव्हा निलेश लंके यांनी आपण लोकसभेचे उमेदवार आहोत, आपल्यासाठी ही प्रचारसभा घेतली जात आहे, याची कोणतीही तमा न बाळगता थेट जमिनीवर बसकण मारली. सभेत इतर वक्त्यांची भाषणं सुरु असताना निलेश लंके स्टेजच्या एका कोपऱ्यात खाली मांडी घालून बसले होते. सभेतील या दृश्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला