राणा दाम्पत्य आज राजधानी दिल्लीत; शाह – बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता

नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, आज नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) राजधानी दिल्लीत असणार आहेत. मुंबईवरून निघून दुपारी दोन वाजता विमानाने दोघेही दिल्लीत दाखल होणार आहेत. या दौऱ्यात राणा दाम्पत्य लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Lok Sabha Speaker Om Birla and Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.