कोल्हापूर येथील पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी अभाविपचे आंदोलन

पुणे – शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) उन्हाळी सत्र परीक्षा या मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. अनेक प्रकारचा विरोध, मागण्या यातून मार्ग काढत शेवटी बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्याची पद्धती विद्यापीठाने अवलंबली. परंतु मागील अनेक दिवसांपासून वारंवार पेपर फुटी सारख्या घटना घडत आहे. यासंदर्भात आज अभावीप कोल्हापूर (Abvp Kolhapur) शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना अभाविपने वारंवार निवेदनाच्या माध्यमातून या बाबत सूचितही केले होते. परंतु कोणत्याही प्रकारची अशी कारवाई केली नाही.

हा सर्व प्रकार घडत असताना माननीय परीक्षा नियंत्रक असणारे डॉ. अजितसिंह जाधव वारंवार संबंधित कर्मचारी व प्राध्यापकांची पाठराखन करताना दिसत आहे, त्यामुळे या प्रकारात त्यांचे हात दगडाखाली आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. Bsc पेपर फुटी प्रकरण, BA पेपर फुटी प्रकरण, Msc micro biology पेपर फुटी प्रकरण, विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील strong रूम ची किल्ली कर्मचारी यांनी सकाळी ७ वाजता घेऊन गेले व १० वाजता घेवुन आले व विद्यापीठा बाहेर विद्यापीठातील एका कर्मचाऱ्यांना जाऊन ती किल्ली घेऊन यावी लागली. हा प्रकार संशयास्पद आहे. विधी शाखेचा IPR (intelectual property law) या पेपर मध्ये ५ प्रश्न ही बाहेरची आल्याचे सांगून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सदरील पेपरच रद्द केला, परंतु यामागील खरे कारण हे, तो पेपर फुटला होता म्हणून रद्द करण्यात आला हे नंतर सामोरे आले.

या घटनेबाबत अभाविप (ABVP) कडून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली व शिवीगाळ केली त्यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लोटांगण घेत आंदोलनं सुरू केले.

यावेळी अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे (Anil Thombre) म्हणाले की, या सर्व प्रकरणात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी शिर्के (Chancellor of the University Hon. Dr. D. T Shirke) गप्प का आहेत, विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे सोडून कुलगुरू आपले संबंध जोपासण्यासाठी परीक्षा नियंत्रक डॉ. अजितसिंह जाधव (Dr. Ajit Singh Jadhav) तसेच दोषी प्राध्यापक व कर्मचारी यांना पाठीशी घालत हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत, ही बाब खूप गंभीर आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या प्रकरणात मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घालत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमावी व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहे. अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल. यावेळी स्वप्नील पाटील, सौरव पाटील, अद्वैत पुंगावकर, दिनेश हुमनाबादे, गौरव ससे, गिरिधर सुतार, पूर्वा मोहिते, तृप्ती ऐतवडे, विद्या लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.