BCCI Central Contracts | ‘नियम सर्वांनाच लागू करा, नाहीतर…’, श्रेयश- इशानला वगळले मात्र पंड्याला करारात ठेवल्याने इरफान पठाणने बीसीसीआयला सुनावले

BCCI Central Contracts : बीसीसीआय ने खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. 2023-24 हंगामासाठी जाहीर झालेल्या या यादीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांची नावे नाहीत. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नव्हता, यामुळे बीसीसीआय या खेळाडूंवर नाराज झाले होते. त्याचा परिणाम वार्षिक करार यादीत दिसून आला आहे.

यापूर्वीच्या करारात श्रेयसला बी श्रेणीत तर ईशानला सी श्रेणीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी श्रेयसला वर्षाला 3 कोटी रुपये आणि ईशानला 1 कोटी रुपये मिळत होते. मात्र आता त्यांचे इतके कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान याप्रकरणी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना पाठिंबा दिला. यासोबतच हार्दिक पांड्यावरून बीसीसीआयला (BCCI Central Contracts) सल्ला दिला आहे.

इरफान पठाण ट्विट करत म्हणाला की, ‘श्रेयस आणि इशान दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. आशा आहे की ते जोरदार पुनरागमन करतील. जर हार्दिक पांड्या सारख्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही.’ असे इरफान म्हणाला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव