Pune Accident : मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याने अपघात; पाच ते सहा वाहनांना उडवलं, एकाचा दुर्दैवी अंत

Pune Accident –  पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे आज पाहायला मिळत आहे. पुण्यातील गजबजलेल्या साहित्यसम्राट न. चिं. केळकर रस्त्यावर  एक भीषण अपघात घडला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  या ठिकाणी एका चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना  उडवत पादचाऱ्यांना धडक दिल्याचे सांगितले जात आहे.

या दुर्घटनेत एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहेत  तर 3 ते ४ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. नारायण पेठ पोलीस चौकीकडून एक चारचाकी वाहन Z- ब्रिजकडे वाहनांना उडवत आले असल्याचे देखील सांगितले जात आहे.  या वाहनाने 2 रिक्षांना जोरदार धडक  दिली तसेच  काही पादचाऱ्यांना देखील उडवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावेळी जमावाने मोटारीवर हल्ला करून चालकाला मारहाण केली. विश्रामबाग पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले.मद्यपान केलेल्या चालकाचे  उमेश हनुमंत वाघमारे(वय 48 ) असे वाहन चालकाचे नाव आहे तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) असे गाडीमालकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मोटारीने धडक दिलेल्या वाहनांमध्ये दुचाकी आणि काही रिक्षा होत्या. त्यामुळे यातील काही प्रवासी जखमी झाले. केळकर रस्ता, लक्ष्मी रास्ता , टिळक चौक (Kelkar Road, Lakshmi Road, Tilak Chowk) या भागात रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.

https://www.youtube.com/shorts/_01cdn7KqwU

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा