देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी नीचपणाचा कळस गाठला आहे – भोसले 

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray)  हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ‘मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते,’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी भाष्य केले असून ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी नीचपणाचा कळस गाठला आहे. त्यांचे मणक्याचे दुखणे आता मेंदुपर्यंत पोहोचले आहे.चांगले ‘उपचार’ करावे लागतील उद्धवजी असं भोसले यांनी म्हटले आहे.